धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर छगन भुजबळ यांचा सल्ला ऐकतील का ?

धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर छगन भुजबळ यांचा सल्ला ऐकतील का ?

बीड – महात्मा फुले समता परिषदेच्या मेळाव्याला राष्ट्रवादी नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते जयदत्त क्षीरसागर यांनी हजेरी लावली. सध्या बीडमध्ये मुंडे आणि क्षीरसागर यांचा छत्तीसचा आकडा आहे. मेळाव्यात क्षीरसागर समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यावरुन राष्ट्रवादीतले मतभेद भुजबळांच्या समोरच चव्हाट्यावर आले. त्यामुळे पक्षात आलेबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

जयदत्त क्षीरसागर राष्ट्रादीवर नाराज आहेत. ते भाजपच्या वाटेवर आहेत असंही बोललं जातंय. त्यांची पंकजा मुंडे यांच्याशी वाढलेली जवळीक आणि मुख्यमंत्र्यासोबतची उठबस यावरुन ते लवकरच भाजपवासी होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र समता परिषदेच्या मेळाव्याला त्यांनी हजेरी तर लावलीच पण भाजप सरकावर हल्लाबोलही केला. शरद पवारांच्या 1 तारखेच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचं वक्तव्यही त्यांनी केलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय निरीक्षक आणि क्षीरसागरांचे कार्यकर्ते बुचळ्यात पडले आहेत. क्षीरसागर नेमकं काय करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणात सरकारर चौफेर हल्ला करताना हे सरकार मराठा- ओबीसी, मुस्लिम असा वाद निर्माण करत असल्याचा आरोप केला. तसंच सरकारच्या या फुटीरवादी प्रय़त्नांना ओबीसींनी बळी पडू नये. त्यांनी ऐकोपा ठेवावा असं आवाहन केलं. कार्यकर्त्यांसोबत त्यांचा रोख धनंजय मुंडे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे होता. त्यामुळेच आता मुंडे आणि क्षीरसागर भुजबळांनी दिलेला सल्ला पाळतात की नाही ते पहावं लागेल. 1 तारखेला शरद पवारा यांच्या उपस्थितीमध्ये बीडमध्ये राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा आहे. त्या कार्यक्रमाला क्षीरसागर हजर राहतात की नाही त्यावरुच ते राष्ट्रवादीत राहतील की भाजपमध्ये जातील याची अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

COMMENTS