बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंना धक्का !

बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंना धक्का !

बीड – बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला असून पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात जलयुक्तच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झालं असल्याचं उघड झालं आहे. परळी तालुक्यात झालेल्या जलयुक्त कामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील 138 मजुर सहकारी संस्थाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी अधिकारी आणि मजूर कंत्राटदारांनी संगणमत करुन बोगस कामं दाखवून 2 कोटी 41 लाख 636 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी पोलिसांकडे तक्रार केली असून आष्टी-पाटोदा, केज, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारुर तालुक्यातील मजूर सहकारी संस्थांवर गुन्हा दाखल केला आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार पुण्यातील कृषी आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर शहानिशा केली असता यामध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचं निदर्शनास आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS