बीड – सिरसाळा येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी !

बीड – सिरसाळा येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी !

बीड, परळी – परळी तालुक्यातील सीरसाळा येथील प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेची महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी आज सिरसाळा येथे येऊन पाहणी केली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघासाठी हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून मुंडे हे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत.

27 जुलै 2017 रोजी मुंडे हे राज्याचे विरोधीपक्षनेते असताना परळीच्या एमआयडीसी साठी तत्कालीन उद्योग मंत्र्यांशी त्यांनी चर्चा घडवून आणली होती.

आज रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर यांच्यासह राजेश जोशी, सुधीर नागे, श्री. हर्षे, श्री. मुळे, श्री. कुऱ्हाडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने सिरसाळा येथील प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी परळीचे तहसीलदार विपीन पाटील, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, प्रा. मधुकर आघाव, कृ. उ.बा.समितीचे सभापती ऍड.गोविंद फड, उपसभापती पिंटू मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, सूर्यभान मुंडे, बाळासाहेब किरवले, राम किरवले, पं. स.सदस्य जानिमिया कुरेशी, राजाभाऊ पौळ, अक्रम पठाण, संतोष पांडे, चंद्रकांत कराड आदी उपस्थित होते.

सिरसाळा येथील गट नंबर 343 मधील एकूण 106 हेक्टर गायरान जमीन या प्रकल्पासाठी प्रस्तावित असून जुलै 2017 मध्ये मुंडे यांनी मागणी केल्यानंतर नोव्हेम्बर 2017 मध्ये भू-निवड समितीने पाहणी करून येथील जागा निवडली होती. एमआयडीसीच्या कामाला गती देण्यासाठी मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नागपूर अधिवेशनात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली होती.

त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात येथील अधिसूचित जमिनीची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी झाली असून, मुंडे यांनी दूरध्वनी वरून या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करून पुढील प्रक्रिया वेगाने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

COMMENTS