बीड जिल्हा परिषदेत भाजपला धक्का, धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा विजय!

बीड जिल्हा परिषदेत भाजपला धक्का, धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा विजय!

बीड – बीड जिल्हा परिषदेत भाजपला धक्का बसला असून धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाट यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीत 58 पैकी 32 मतं महाविकासआघाडीला तर 21 मतं भाजपला मिळाली आहेत. तर यातील 5 जण मतदानास अपात्र ठरले आहेत. हायकोर्टाच्या आदेशामुळे हा निकाल 13 जानेवारीपर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच भाजपने पराभव स्वीकारला होता. ‘लोकशाहीची प्रक्रिया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत’ असं ट्वीट करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदान सोडलं होतं. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. पण पंकजा मुंडे यांनी सत्ताचक्र फिरवत सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत मात्र पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे.

COMMENTS