अजित पवारांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “दादा आपके राज्य में बिना इजाजत आय हूँ !” VIDEO

अजित पवारांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “दादा आपके राज्य में बिना इजाजत आय हूँ !” VIDEO

पुणे- जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कौन्सिल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.

यावेळी दादा आपको स्वतंत्रता दिन की बहुत बहुत शुभ कामानाए, आपके राज्य में बिना इजाजत आय हूँ… असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास आल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नमस्कार करत विनोदी शैलीत म्हटले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना नमस्कार करत हसून नहीं नहीं… असे म्हणून  राज्यपाल कोश्यारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत ध्वजारोहणासाठी नेले.तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नमस्कार करत, आपको भी स्वतंत्रता दिन की  बहुत बहुत  शुभ कामानाए.. असे म्हणत प्रतिसाद दिला.

COMMENTS