पक्षांतर करणार, पण भाजपात जाणार नाही, भास्कर जाधवांची कबुली !

पक्षांतर करणार, पण भाजपात जाणार नाही, भास्कर जाधवांची कबुली !

गुहागर – राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी अखेर पक्ष सोडणार असल्याची कबुली दिली आहे. जाथव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक खेतली. या बैठकीत आपण दोन दिवसात पक्षांतर करत असल्याची जाहीर कबुली दिली आहे. मात्र आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जाधव यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.येतील त्यांना सोबत घेऊ,जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल नाराजी नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. परंतु भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच भास्करराव जाधव यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वार टीका केली होती. ‘मी याआधीच पक्षाकडे मुंबईचं अध्यक्षपद मागितलं होतं. पण पक्षाने तेव्हा माझं ऐकलं नाही,’ असं म्हणत भास्कर जाधव यांनी पक्षनेतृत्वार नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी शिवससेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी होय, माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचं आमंत्रण मला दिलं आहे. मात्र याविषयी कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज डाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

COMMENTS