गोवा – मनोहर पर्रिकर सोडणार मुख्यमंत्रीपद, राजकीय हालचालींना वेग ?

गोवा – मनोहर पर्रिकर सोडणार मुख्यमंत्रीपद, राजकीय हालचालींना वेग ?

गोवा – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. गेली काही महिन्यांपासून पर्रिकर यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच चालली आहे. अमेरिकेहून उपचार घेऊन आल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा होत नाही. त्यामुळे पुन्हा त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पर्रिकर यांच्या प्रकृतीमुळे गोव्यातील प्रशासन देखील ठप्प होत चाललं आहे. त्यामुळे पर्रिकर हे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान भारतीय जनता पार्टीची केंद्रीय समिती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गोव्यामध्ये दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच ते पर्यायी नेतृत्वाची व्यवस्था करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.पर्रिकरांनी शुक्रवारी रूग्णालयाला भेट दिल्यानंतर राज्यातल्या अन्य नेत्यांना फोन केला तसेच मंत्र्यांना बोलावून घेतले. याआधी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पर्रीकर विधानसभा बरखास्त करतील व पुन्हा निवडणुकांची मागणी करतील असा दावा गव्हर्नर मृदुल सिन्हा यांना भेटून केला होता.

गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू

भाजपाच्या कोअर कमिटीतही पर्रिकरांच्या अनारोग्यामुळे कमालीची अस्वस्थता आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधून तातडीने नेतृत्वबदल करण्याची मागणी केली आहे. घटकपक्षांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड यांचा समावेश आहे. या पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नेतृत्वबदल अटळ आहे आणि पक्षश्रेष्ठींचा दूत काय संदेश घेऊन येतोय, याकडे त्यांचंही लक्ष लागलंय.

दरम्यान, विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.40 सदस्यीय राज्य विधानसभेत भाजपाचे 14 काँग्रेसचे 16 राष्ट्रवादी 1 मगोपचे 3, गोवा फॉरवर्डचे तीन आणि 3 अपक्ष सदस्य आहेत.

 

COMMENTS