भाजपचे दोन दिग्गज नेते निवडणुकीची जबाबदारी घेण्यास करतायेत टाळाटाळ !

भाजपचे दोन दिग्गज नेते निवडणुकीची जबाबदारी घेण्यास करतायेत टाळाटाळ !

नंदुरबार – निवडणुकीच्या जबाबदारीवरुन वाद, भांडण झालेली उदाहरणे आपण नेहमी पाहतो. पण निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे द्या, माझ्या समर्थकांना तिकीटे द्या यावरुन वाद नेहमी होतात. मात्र निवडणुकीची जबाबदारी माझ्याकडे नको असा वाद विरळच… पण सध्या असा वाद सुरू आहे भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये…..

नंदुरबार जिल्हयात तीन नगरपालिकांची निवडणुक होत आहे. नदराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र भाजपचे दोन नेते निवडणुकीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत आहेत. नंदूरबार नगरपालिका निवडणुकीची जबाबादी भाजपने माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे दिली आहे. मात्र ती जबाबदारी घेण्यास त्यांनी नकार दर्शवलाय. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी ही जबाबदारी घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र मंत्री जयकुमार रावल यांनीही नंदूरबार नगरपालिका निवडणुकीची जबाबदीर घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे आता नंदूरबारमध्ये भाजपची जबाबदारी कुणाकडे असा प्रश्न स्थानिक नेत्यांना पडला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर आणि तळोदा या नगरपालिकांची निवडणुक लागली आहे. भाजपने नवापूरची जबाबदारी खासदार डॉ हीना गावित यांच्यावर सोपवली आहे, तर तळोद्याची जबाबदारी आमदार उदेसिंग पाडवी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.  नंदुरबार पालिकेची जबाबदारी आमदार डॉ विजयकुमार गावितांना सोपवली असली तरी त्यांनी यात रस दाखवलेला नाही. मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

COMMENTS