नागपूर – ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का, नितीन गडकरींच्या मुळ गावात आणि दत्तक घेतलेल्या गावातही पराभव !

नागपूर – ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का, नितीन गडकरींच्या मुळ गावात आणि दत्तक घेतलेल्या गावातही पराभव !

नागपूर – नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला असून नितीन गडकरींच्या मुळ गावात आणि दत्तक घेतलेल्या गावातही भाजपचा पराभव झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला 2 ठिकाणी धक्का बसला आहे. गडकरींचे मुळ गाव धापेवाडा येथे काँग्रेस समर्थीत सरपंचपदाचे उमेदवार सुरेश डोंगरे विजयी झाले आहेत. याठिकाणी काँग्रेसचे 16 तर भाजपचा केवळ एक उमेदवार निवडून आला आहे.  तसेच गडकरींनी दत्तक घेतलेले गाव पाचगाव येथे काँग्रेस समर्थीत सरपंचपदाच्या उमेदवार उषा ठाकरे विजयी झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसचे 10 तर भाजपचा एक उमेदवारी विजयी झाला आहे.

दरम्यान या ग्रामपंचायतींसाठी काल मतदान घेण्यात आले होते. याचा निकाल आज लागला आहे.  930 ग्रामपंचायतींसाठी 79 टक्के मतदान झाले होते. ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हे मतदान घेण्यात आले होते. यात 930 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे.

 मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 5, रायगड- 96, रत्नागिरी- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 20, धुळे- 74, जळगाव- 5, अहमदगनर- 66, नंदुरबार- 54, पुणे- 47, सोलापूर- 59, सातारा- 32, सांगली- 1, कोल्हापूर- 15, बीड- 2, नांदेड- 12, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 2, नागपूर- 373, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 930.

COMMENTS