“आगामी निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर पकडो विकावे लागतील !”

“आगामी निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर पकडो विकावे लागतील !”

नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर सर्वांवर पकडो विकण्याची वेळ येईल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजप सरकारविरोधात आज समाजवादी पार्टीने देश बचाओ सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान ‘2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराजय करणं गरजेचं आहे. जर तसं झालं नाही तर आपल्या सगळ्यांवर पकोडे विकण्याची वेळ येईल असंही अखिलेश यांनी म्हटलं आहे. तसेच नालीमधून गॅस निघतो असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपला पराजय झाला तर आपल्याला नालीच्या गॅसवर पकडो विकावे लागती असा निशाणाही अखिलेश यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.तसेच भाजप फक्त देशालाच नाही तर लोकतंत्रलाही धोक्यात टातक असल्याचा आरोप यावेळी अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यासाठी आपण लोकतंत्र बचाओ यात्रा काढत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

तसेच यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही अखिलेश यांनी जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांनी देशभरात डायबिटीज आजार वाढत असल्यामुळे शेतक-यांनी उसाचं उत्पादन घेऊ नये असा सल्ला त्यांनी शेतक-यांना दिला होता. त्यावर अखिलेश यांनी जोरदार टीका केली असून आजच्या मुख्यमंत्र्यांसारखा मुख्यमंत्री जगात शोधूनही कुठे सापडणार नाही. ते जो शेतक-यांना सल्ला देतात यावरुन ते किती मोठे डॉक्टर आहेत हे समजतं. तसेच जेवढे पेपर योगी सरकारमध्ये लीक झालेत तेवढे आजपर्यंत कधीच लीक झाले नसल्याचा आरोपही यावेळी अखिलेश यांनी केला आहे.

COMMENTS