सध्या तरी ‘घरवापसी’ करणार नाही, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्याचं स्पष्टीकरण!

सध्या तरी ‘घरवापसी’ करणार नाही, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्याचं स्पष्टीकरण!

मुंबई – माझ्याशी कुणाचाही संपर्क नाही. मी आहे त्या घरी सध्या तरी सुखी आहे, त्यामुळे सध्या तरी ‘घरवापसी’ करणार नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले वैभव पिचड यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले नेते आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. परंतु पिचड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते सध्या तरी भाजपमध्येच राहणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे सुपूत्र वैभव पिचड हे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे पिचड पिता पूत्र परत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी राजकीय चर्चा रंगली होती. परंतु माझ्याशी कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी आहे त्या घरी सध्या तरी सुखी आहे, त्यामुळे सध्या तरी ‘घरवापसी’ करणार नसल्याचं स्पष्टीकरण वैभव पिचड यांनी केलं आहे.

COMMENTS