भाजपातून हकालपट्टी झालेला हा नेता शिवसेनेच्या व्यासपीठावर, म्हणाले…”मुख्यमंत्री ते डबल इंजिन तुम्हाला अपशकुन ठरेल !”

भाजपातून हकालपट्टी झालेला हा नेता शिवसेनेच्या व्यासपीठावर, म्हणाले…”मुख्यमंत्री ते डबल इंजिन तुम्हाला अपशकुन ठरेल !”

मुंबई – कणकवली मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार असताना विरोधी उमेदवाराचा प्रचार करून पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भाजपाचे संदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपातून हकालपट्टी झालेले संदेश पारकर शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसून आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कणकवलीतील सभेत पारकर यांनी भाषण केले आहे.

दरम्यान यावेळी पारकर यांनी मुख्यमॆत्र्यांना खडेबोल सुनावले आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल महाराष्ट्राला अभिमान आहे. ते काल म्हणाले नितेश राणेंना संयम शिकवायचा आहे. परंतु नितेश राणेंना गुंडगिरीचे बाळकडू त्यांच्या पिताश्रींकडून मिळालं आहे. ते कुठल्या शाळेत गेले तरी सुधारणार नाहीत, उलट ती शाळा बदनाम होईल. मुख्यमंत्री जे डबल इंजिन घेऊन घौडदौडीला निघाले आहे ते बंद पडलेले आहे, ते इंजिन मुख्यमंत्री तुम्हाला अपशकुन ठरेल असं पारकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS