लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा अंदाज !

लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा अंदाज !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहणार असल्याचा अंदाज भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं वर्तवला आहे.भाजप बहुमतापासून दूर राहण्याचा अंदाज भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी वर्तवला आहे. राम माधव यांच्यासारख्या भाजपमधील दिग्गज नेत्यांनी भाजपच्या बहुमताच्या दाव्यावर शंका व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळातच आता चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान भाजपला पुन्हा एकदा बहूमत मिळेळ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. परंतु राम माधव यांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे चर्चेला उधाण आलं आहे. उत्तर भारतातील ज्या राज्यात भाजपला 2014 साली विक्रमी जागा मिळाल्या होत्या, तिथे नुकसान होऊ शकतं. मात्र, ईशान्य भारतातील राज्य आणि ओदिशा, पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा होणार असल्याचंही राम माधव यांनी म्हटलं आहे.

COMMENTS