अटलजींच्या अस्थीकलश यात्रेत भाजप नेत्यांचं असभ्य वर्तन !

अटलजींच्या अस्थीकलश यात्रेत भाजप नेत्यांचं असभ्य वर्तन !

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं विसर्जन राज्यातील 100 नद्यांमध्ये केलं जात आहे. प्रत्येक राज्यात अस्थीकलश पाठवण्यात आले आहेत. अस्थीकलश यात्रा काढून अटलजींना श्रद्धांजली वाहिली जात आहे. छत्तीसगढमध्येही श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु यादरम्यान भाजपच्या नेत्यांचं असभ्य वर्तन समोर आलं आहे. छत्तीसगडमध्ये वाजपेयींच्या श्रद्धांजली सभेत भाजपाच्या ब्रिजमोहन अग्रवाल आणि अजय चंद्राकर हे दोन्ही मंत्री व्यासपिठावर हसत असल्याचं आढळून आलं आहे.

दरम्यान यावेळी या दोन्ही मंत्र्यांना भाजपाध्यक्षांनी फटकारलं असल्याची माहिती आहे. तसेच या दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या या वर्तणुकीबाबत विरोधकांकडूनही जोरदार टीका केली जात आहे. या मंत्र्यांचं वर्तन असोभणीय असून फक्त दिखावा केला जात असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. तर या दोन्ही मंत्र्यांनी मात्र असं काही घडलं नसल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS