भाजप आमदाराच्या मुलाची गुंडागर्दी, हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल !

भाजप आमदाराच्या मुलाची गुंडागर्दी, हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल !

नवी दिल्ली –  भाजप आमदाराची गुंडागर्दी समोर आली असून आपल्या गाडीला ओव्हरटेक करु न दिल्यामुळे त्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असून या व्हिडीओमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. भाजपा आमदार धन सिंह रावत यांचा मुलगा राजा यांने हे कृत्य केलं असून आपल्या सहकाऱ्यांसह गाडीतून जात असताना त्यांने केवळ ओव्हरटेक करण्यासाठी जागा दिली नाही म्हणून एका व्यक्तीला आमदाराच्या भररस्त्यात बेदम मारहाण केली आहे.

दरम्यान बांसवाडा जिल्ह्यात १ जून रोजी ही घटना आहे. राजा याने आपल्या सहका-यांसोबत गाडीचीही तोडफोड केली आली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. या प्रकरणी राजा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

COMMENTS