‘त्या’ भाजप आमदारावर मुलीला पळवून नेल्याचा आरोप !

‘त्या’ भाजप आमदारावर मुलीला पळवून नेल्याचा आरोप !

नवी दिल्ली – भाजप आमदारानं मुलीला पळवून नेलं असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी आणि खुद्द आमदाराच्या पत्नीनं केला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील भाजप आमदार गगन भगत यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे. भगत यांचे महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत विवाहबाह्य  संबंध असल्याचा दावा त्यांची पत्नी मोनिका शर्मा यांनी केला आहे. तसेच गगन भगत यांनी या मुलीसोबत लग्न केलं असल्याचाही आरोप त्यांच्या पत्नीनं केला आहे.

दरम्यान गगन भगत यांच्यावर या विद्यार्थिनीच्या वडिलांनीही गंभीर आरोप केले असून भगत यांनी आपल्या मुलीचं अपहरण केलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान आमदार भगत आणि विद्यार्थिनीनं मात्र या दोघांचेही आरोप फेटाळले असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा डाव या दोघांचाही असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या पत्नीसोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. परंतु गेली दहा महिन्यांपासून आम्ही वेगळे राहत आहोत परंतु घटस्फोटासाठी धाव घेतलेली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत मोनिका शर्मा यांनी पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली असल्याची माहिती आहे.

COMMENTS