राज्यातील ‘या’ चार खासदारांनी मोदींच्या बैठकीला मारली दांडी, चर्चेला उधाण !

राज्यातील ‘या’ चार खासदारांनी मोदींच्या बैठकीला मारली दांडी, चर्चेला उधाण !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप खासदारांची बैठक घेतली. परंतु मोदींच्या या बैठकीला राज्यातील चार खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या बैठकीला भाजपचे अनेक खासदार अनुपस्थित होते. महाराष्ट्रातील खासदार संजयकाका पाटील, शरद बनसोडे, रक्षा खडसे, प्रीतम मुंडे यांनी बैठकीला दांडी मारली आहे.

दरम्यान पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील दारुण पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप खासदारांच्या बैठकीत काय बोलणार याकडे लक्ष होते. मात्र पंतप्रधानांनी निवडणूक विषयाला स्पर्शही न करता खासदारांना उपदेशाचे डोस पाजले.

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, खासदार भोला सिंग यांच्या कार्याला उजाळा देत अटलजींसारखे पक्षासाठी समर्पण द्या असे आवाहन मोदींनी खासदारांना केले. परंतु मोदींच्या या बैठकीला वारंवार कानपिचक्या देऊनही दांडी मारण्याची परंपरा भाजप खासदारांनी कायम ठेवली असल्याचं पहावयास मिळाले आहे.

 

COMMENTS