विजयाची हॅट्रिक करणारा भाजप खासदार नाराज, पक्ष सोडणार ?

विजयाची हॅट्रिक करणारा भाजप खासदार नाराज, पक्ष सोडणार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. या यादीत काही विद्यमान खासदारांना डच्चू दिला आहे. त्यामुळे हे विद्यमान खासदार पक्षावर नाराज असून ते बंडखोरी करु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपानं डच्चू दिला आहे. हरिश्चंद्र चव्हाणांना डावलून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली.

त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज आहेत. चव्हाणांना डावलणं त्यांच्या समर्थकांच्या देखील चांगलंच जिव्हारी लागलं आहे.पक्षाशी प्रामाणिक असताना चव्हाणांना का डावललं असा संतप्त सवाल कार्यकर्ते विचारत आहे. याच पार्श्वभूमीवर हरिश्चंद्र चव्हाण हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे पक्ष सोडला तर ते कोणत्या पक्षात जाणार की अपक्ष लढणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

COMMENTS