महाविकासआघाडीचं ठरल्यानंतर भाजपची नवी खेळी, शिवसेनेला पाठवला ‘हा’ प्रस्ताव!

महाविकासआघाडीचं ठरल्यानंतर भाजपची नवी खेळी, शिवसेनेला पाठवला ‘हा’ प्रस्ताव!

मुंबई – राज्यात लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस म्हणजेच महाविकासघाडीचं सरकार स्थापन होणार आहे. तिन्ही पक्षांची बोलणी जवळपास निश्चित झाली असल्याचं चित्र आहे. परंतु अशातच आता भाजपनं शिवसेनेला नवा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती आहे.
शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याची तयारी भाजपने दर्शविली असल्याची माहिती आहे. या संदर्भात भाजपच्या दिल्लीतील एका बडय़ा नेत्याने ‘मातोश्री’शी संपर्क साधला. पण शिवसेनेकडून रात्री उशिरापर्यंत काही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची चर्चा आता पुढे गेली असून, सारे सूत्रही निश्चित झाले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला माघार घेणे शक्य नाही.
त्यामुळे भाजपला आता सत्तेपासून दूर रहावे लाहणार आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप युतीला जनतेनं बहूमत दिलं. परंतु मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्ष दुरावले गेले. त्यानंतर आता लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस म्हणजेच महाविकासघाडी लवकरच सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. तिन्ही पक्षांची बोलणी जवळपास पूर्ण झाली आहे. परंतु अशातच भाजपनं आता नवी खेळी खेळली आहे. भाजपनं शिवसेनेला नवा प्रस्ताव पाठवला असून
शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याची तयारी भाजपने दर्शविली असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपची ही खेळी यशस्वी होणार नसल्याचं दिसत आहे.

COMMENTS