विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून ‘या’ नेत्याची निवड!

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपकडून ‘या’ नेत्याची निवड!

नागपूर – नागपूर येथे आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं होतं. परंतु आज अखेर प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस, सूरजीतसिंह ठाकूर यांचंही नाव चर्चेत होतं. परंतु विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर
वर्णी लागली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाला आजपासुन सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे सर्व आमदार भगव्या रंगाच्या ‘मी सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात आले आहेत. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपुरात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS