भाजपची दुसरी यादी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचं नाव नाही!

भाजपची दुसरी यादी जाहीर, ‘या’ बड्या नेत्यांचं नाव नाही!

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपनं आज दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपनं काल 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या पहिल्या यादीमध्ये विद्यमान 12 आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान, नागपूर दक्षिण-पश्चिम- देवेंद्र फडणवीस, कोथरूड- चंद्रकांत पाटील, सातारा- शिवेंद्रराजे, कसबा- मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आज 14 उमेदवारांची यादी भाजपनं जाहीर केली आहे.

दरम्यान या दुसऱ्या यादीतही विनोद तावडे, एकनाथ खडसे, बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तसेच खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना दुसय्रा यादीत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जा होती. परंतु त्यांनाही या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही.

परंतु बाहेरून पक्षात आलेले गाेपाळदास अग्रवाल, निलय नाईक, गाेपीचंद पडळकर, नमिता मुंदडा यांची नावे मात्र या यादीत आहेत. उदगीरचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षानं धक्का दिला असून त्यांच्या जागी डॉ. अनिल कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार सुधाकर भालेराव यांनी मागील दोन्ही वेळा इथून विजय प्राप्त केला आहे.

COMMENTS