भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर दिसणार कमळाच्या पणत्या, लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने भाजपचं अभियान !

भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर दिसणार कमळाच्या पणत्या, लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने भाजपचं अभियान !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपचं महाअधिवेशन आजपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ आणि वरीष्ठ नेते या अधिवेशनाला हजर राहणार आहे. या अधिवेशनादरम्यान तीन कार्यक्रम जाहीर केले जाणार असल्याची माहिती आहे.

हे तीन कार्यक्रम होणार जाहीर

1) मेरा परिवार, भाजप परिवार

या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन भाजप परिवारातील असल्याचा विश्वास द्यायचा आहे. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याने माझा परिवार भाजप परिवार’ असा संकल्प करायचा आहे.

2) कमळ ज्योती संकल्प अभियान

कमळ ज्योती संकल्प अभियानाच्या माध्यमातून २६ जानेवारी पर्यंत प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने आपल्या घरावर आणि दारात कमळाच्या आकाराच्या पणती लावायच्या आहेत. कमळ आपल्या घरात असल्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

3) सकाळी साडेदहा पूर्वी मतदान

कोणत्याही निवडणूकीत सकाळी साडे दहा पूर्वी मतदान कमी पडते. संध्याकाळी मतदानाची टक्केवारी वाढत जाते. पण भाजप आता सकाळी साडेदहा पूर्वी मतदान करण्यासंदर्भात मोहीम उघडणार आहे.

लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

COMMENTS