सेनेचा सिंधुदर्गात बुरुंज ढासळला

सेनेचा सिंधुदर्गात बुरुंज ढासळला

सिंधुदुर्ग : कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारील होती. मात्र, आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी आपले वर्चस्व कायम आहे. सिंधुदुर्गात भाजपने तब्बल ४५ ग्रामपंचायती मिळवल्या आहेत. तर शिवसेनेकडे २१ ग्रामपंचायती गेल्या आहेत. तर राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत.

देवगड मतदारसंघात भाजपला बहुमत मिळालं आहे. देवगड विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. देवगड तालुक्यात भाजपाने 17 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. तर सेना 4, राष्ट्रवादी 1 आणि गाव पॅनल कडे 1 ग्रामपंचायत आली आहे. वैभववाडी तालुक्यात 9 भाजपा आणि 4 ग्रामपंचायती सेनेकडे आल्या आहेत. तर कणकवलीत 2 शिवसेना आणि 1 भाजपाकडे आली आहे.

मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला आहे. तालुक्यात 5 ग्रामपंचायतींवर भाजपाने सत्ता मिळविली आहे. तर 1 ग्रामपंचायत सेनेकडे आली आहे. कुडाळ तालुक्यात 4 ग्रामपंचायतींवर भाजपा, 4 सेना आणि 1 गाव पॅनल कडे आली आहे. सावंतवाडीत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना धक्का बसला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले तर भाजपा आमदार आशिष शेलार यांची सासुरवाडी असलेल्या दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले आहे. तालुक्यात 8 ग्रामपंचायती भाजपाकडे तर 3 ग्रामपंचायती सेनेकडे आल्या आहेत.

दोडामार्ग तालुक्यात 2 ग्रामपंचायती सेनेकडे तर 1 ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनल कडे आली आहे. वेंगुर्ले तालुक्यात 1 सेनेकडे आणि 1 भाजपाकडे आली आहे. एकंदर जिल्ह्यात भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले असले तरी देखील सेनेने आपले वर्चस्व कायम असल्याचा प्रतिदवा केला आहे.

COMMENTS