महापालिका आयुक्तांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली, चार सुरक्षा रक्षक तडकाफडकी निलंबित !

महापालिका आयुक्तांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली, चार सुरक्षा रक्षक तडकाफडकी निलंबित !

मुंबई –  महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे चार सुरक्षा रक्षक तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहेत.महापालिका मुख्यालयाबाहेर वाहतूक कोंडी न हटवल्याने ही कारवाई करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर गेटवर सुमारे 15 मिनिटे एकही सुरक्षा रक्षक तैनात नव्हता. 3 पुरुष आणि एका महिला सुरक्षा रक्षकावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यालय सुरक्षेत हलगर्जीपणा करणं या सुरक्षा रक्षकांच्या चांगलच आंगलट आलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान या घटेनेला चार दिवस झाले असून कारवाई करण्याचे आदेश काल काढण्यात आले असल्याची माहिती आहे. आयुक्तांना म्युनिसिपल बँकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहायचे होते. परंतु ट्रॅफीकमध्ये अडकल्यामुळे त्यांना सभेला जाण्यास उशीर झाला होता. दरम्यान यापूर्वी ही याप्रकारचा हलगर्जीपणा आढळून आला होता. त्यावेळीही आयुक्तांनी कडक कारवाईचे आदेश आदेश दिले होते.

 

COMMENTS