मुंबई – बोरिवली येथील कांदरपाड्यात कोव्हीड केयर केंद्राचे हस्तांतरण !

मुंबई – बोरिवली येथील कांदरपाड्यात कोव्हीड केयर केंद्राचे हस्तांतरण !

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) बोरिवली कांदरपाडा येथे कोव्हीड केयर केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे हस्तांतरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. पश्चिम उपनगरांतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता याठिकाणी केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी केली होती. बोरिवली (पश्चिम) आरटीओ कार्यालयाजवळील कांदरपाडा बेस्ट बस डेपोच्या जागेत डायलिसिस सुविधा असणारी 110 बेडचे अतिदक्षता विभागांचे एक अलगीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. याठिकाणी संपूर्ण वातानुकूलीत कक्ष उभारण्यात आले आहेत.

COMMENTS