लातूर – असले धाडस करु नका, पुरात वाहून जातानाचा लाईव्ह व्हिडीओ !

लातूर – असले धाडस करु नका, पुरात वाहून जातानाचा लाईव्ह व्हिडीओ !

लातूर – शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडी येथे पुलावरून एक जण वाहून गेला असल्याची घटना घडली आहे.  घरणी नदीवरून पाणी जात असताना चालत पूल पार करण्याचा केला प्रयत्न केल्यामुळे ही व्यक्ती वाहून गेली आहे.  पाण्याचा मोठा प्रवाह असल्यामुळे ही व्यक्ती  पाण्यात वाहून गेली असून आज दुपारपासून शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे याठिकाणच्या नदीला पूर आला असून पूल पार करणं या तरुणाच्या जिवावर बेतलं आहे.

दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून या पुरामध्ये अनेक जण अडकण्याच्या घटना घ़डत आहेत. त्यामुळे पूल ओलांडण्याचा अथवा पुरात उतरण्याचा प्रयत्न करु नका. हा प्रयत्न अथवा धाडस तुमच्या जिवावर बेतू शकते.

COMMENTS