केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’मध्ये विदर्भ, मराठवाडा आघाडीवर !

केंद्र सरकारच्या ‘भारतनेट’मध्ये विदर्भ, मराठवाडा आघाडीवर !

मुंबई – केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी ‘भारतनेट’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ हजार 378 ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉड बँडद्वारे जोडण्याच्या कामाबद्दल महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. या टप्यात राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभाग आघाडीवर आहे.

विदर्भात सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा                                               

भारतनेट प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात विदर्भातील ११ जिल्हयांमध्ये एकूण ३ हजार ६०४ ग्रामपंचायतींना इंटरनेटने जोडण्यात आले आहे. या विभागात ७६० ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झालेला नागपूर जिल्हा अग्रेसर ठरला आहे. याशिवाय गोदिंया जिल्हयातील ५१३, भंडारा ४५९, अमरावती ३२७, चंद्रपूर ३१५,वर्धा २७०, बुलढाणा २६८,गडचिरोली २०५, यवतमाळ २०३, अकोला १४३ आणि वाशिम जिल्हयातील १४१ ग्रामपंचायती  इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत.

 

मराठवाड्यातही इंटरनेटचं जाळं

मराठवाडयातील ३ हजार २००  ग्रामपंचायतीं इंटरनेट सेवेने जोडण्यात आल्या आहेत. या विभागात ८०७ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झालेला बीड जिल्हा अग्रेसर ठरला आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्हयातील ६०९, जालना ४८०, लातूर ३३५, नांदेड ३१८, औरंगाबाद २९४, परभणी २४७ आणि हिंगोली जिल्हयातील ११० ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत.

 

खानदेशातील १ हजार ७५५ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट                                              

खानदेश विभागातील १ हजार ७५५  ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. या विभागात ४६३ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झालेला नाशिक जिल्हा अग्रेसर ठरला आहे. याशिवाय जळगाव जिल्हयातील ३९९, धुळे ३६७, नंदुरबार ३१७, आणि अहमदनगर जिल्हयातील २०९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्र                                                                  

या विभागातील २ हजार ४२१ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. या विभागात ६९८ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झालेला पुणे जिल्हा अग्रेसर ठरला आहे. याशिवाय सांगली जिल्हयातील ५१७, कोल्हापूर ५०४, सातारा ४३३  आणि सोलापूर जिल्हयातील २६९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत.

 

कोकणातील १ हजार ३६५ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट                                                                               

कोकणातील १ हजार ३६५ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. या विभागात ७३१ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झालेला रायगड जिल्हा अग्रेसर ठरला आहे. याशिवाय सिंधुदूर्ग जिल्हयातील २६०, रत्नागिरी २२२, पालघर ९३   आणि ठाणे जिल्हयातील ५९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत.

COMMENTS