कांदा दर घसरल्यामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सबसिडीत केली वाढ !

कांदा दर घसरल्यामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सबसिडीत केली वाढ !

नवी दिल्ली – कांदा दर घसरल्यामुळे देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. या शेतकय्रांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सबसिडीत वाढ केली आहे. कांदा निर्यातीवर देण्यात येणारी सबसिडी दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.  कांदा निर्यातीवर देण्यात येणारी 5 टक्के सबसिडी वाढवून 10 टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान निर्यात वाढल्यास कांद्याची उपलब्धता कमी होऊन भाव वाढू शकतील. त्यामुळे सबसिडी वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. माहितीनुसार, मर्चंडाईज एक्स्पोर्टस् फ्रॉम इंडिया (एमईआयएस) या योजनेंतर्गत कांदा निर्यातीवर सध्या 5 टक्के सबसिडी देण्यात येते. या सबसिडीची मुदत 12 जानेवारी 2019 रोजी संपत असून सबसिडीची रक्कम 10 टक्के करून 30 जून 2019 पर्यंत ती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे.

कांद्याचे उतरलेले भाव सावरण्यासाठी निर्यात अनुदान 10 टक्के करणे तसेच निर्यात शुल्क शून्य टक्क्यावर कायम राखणे या उपाययोजना करण्याबाबत आपण केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS