2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच दिलासा देणार -भुजबळ

2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच दिलासा देणार -भुजबळ

मुंबई – 2 लाख रुपयांचा वरती कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच दिलासा देणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा राज्यातील 30 लाख 57 हजार शेतकऱ्यांना फायदा मिळणार असून 21 हजार 200 कोटी रुपये कर्जमाफी संदर्भात वाटप केले जाणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या सोमवारी ३० तारखेला होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसंच मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षात मतभेद नाहीत, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदा बाबतच्या ज्या चर्चा आहेत या केवळ वृत्तपत्रांमधून होत आहेत. त्यात तथ्य नाही, असा दावा भुजबळांनी केला. ३० तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटपही त्याच दिवशी होईल, असं भुजबळ म्हणाले.

COMMENTS