छगन भुजबळ दिल्लीत, अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं जोरदार स्वागत !

छगन भुजबळ दिल्लीत, अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलं जोरदार स्वागत !

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एक्स्टेंन्डेट वर्किंग कमिटीच्या बैठकीसाठी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ हे आज दिल्लीला गेले आहेत. यावेळी छगन भुजबळ यांचे आगमन झाले असता अखिल भारतीय समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे दिल्ली विमानतळावर मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. यावेळी छगन भुजबळ यांच्या गळ्या फुलांच्या मोठा हार घालून या कार्यकर्त्यांना भुजबळांचं स्वागत केलं आहे.

दरम्यान भुजबळ आज दिल्लीला येणार असल्याची माहिती मिळताच अखिल भारतीय समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते विमान तळावर जमले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ विमानतळावर दाखल होताच या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भुजबळ यांचं जोरदार स्वाग केलं आहे.

COMMENTS