दगडूशेठ गणपतीसमोर पंचवीस हजार महिलांनी अथर्व शिर्ष पठण केलं पण…भुजबळांनी व्यक्त केली खंत!

दगडूशेठ गणपतीसमोर पंचवीस हजार महिलांनी अथर्व शिर्ष पठण केलं पण…भुजबळांनी व्यक्त केली खंत!

मुंबई – कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. पण दगडूशेठ गणपतीसमोर पंचवीस हजार महिलांनी अथर्व शिर्ष पठण केलं. तोंडपाठ करुन म्हटलं. आंनदाची बाब आहे. मात्र या महिलांना ज्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले त्या सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा समोरच आहे. तेथे मात्र यातील एकही महिला गेली नाही अशी खंत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्याती कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलत असताना भुजबळ यांनी संभाजी भिडे.यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.काळ बदलतोय. मनुवाद येतोय. आता फळे खाऊन मुलं होतात असा टोला छगन भुजबळ यांनी भिडे गुरुजींवर लगावला आहे.

COMMENTS