राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांना चंद्रकांत पाटलांच्या दारात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या !

राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांना चंद्रकांत पाटलांच्या दारात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्षांना चंद्रकांत पाटलांच्या दारात पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्याचं पहावयास मिळाले आहे. झालं असं की काल भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजप पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले वैभव पिचड, चित्रा वाघ, आमदार संदीप नाईक यांची बैठक सुरु होती. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे काही खासगी कामासाठी चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर गेले होते. त्यावेळी तटकरे यांना पाहून काही क्षणांसाठी सर्वच अवाक झाले होते.

दरम्यान पाटील यांच्या बंगल्यावरील वातावरण पाहुन या पक्षप्रवेशाच्या माहौलात आपल्या नावाची विनाकारण चर्चा नको, म्हणून सुनील तटकरेंनी क्षणाचाही विलंब न लावता बंगल्यातून तात्काळ काढता पाय घेतला. परंतु राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्षच चंद्रकांत पाटलांच्या दारात आले असल्याचं पाहून राजतीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तसेच तटकरे पाटील यांच्या बंगल्यावर कशासाठी गेले होते याबाबतची माहिती मात्र अजूनपर्यंत समजू शकली नाही.

COMMENTS