महसूलमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोघींना उडवलं !

महसूलमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोघींना उडवलं !

नागपूर – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील एका गाडीनं दोघींना उडवलं असल्याची घटना घडली आहे. नागपूरमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात दोन तरुणी किरकोळ जखमी झाल्या आहेत. आरबीआय कॉर्टर चौकात शनिवारी ही घटना घडली असून अपघातावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे ताफ्यातील गाडीत नसल्याची माहिती मिळत आहे.

अंकिता चावला आणि साक्षी जांगीड असं या जखमी तरुणींचं नाव असून त्या दुचाकीवरुन जात असताना चंद्रकांत पाटील यांच्या गाडीच्या ताफ्यातील एमएच ३१ बीपी ०५५९ क्रमांकाच्या बोलेरो व्हॅनने अंकिता व साक्षीच्या दुचाकीला धडक दिली. हा शासकीय गाड्यांचा ताफा चंद्रकांत पाटील यांना घेण्यासाठी जात होता त्यादरम्यान ही घटना घडली असून चंद्रकांता पाटील या गाडीत बसलेले नव्हते.

दुचाकी चालवत असताना अंकिताने हेल्मेट घातले असल्यामुळे तिच्या डोक्याला  कोणत्याही प्रकारची जखम झाली नाही. परंतु  साक्षीने हेल्मेट न घातल्याने तिच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे. तसेच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी गाडीचे चालक विठ्ठल जाधव यांनाही किरकोळ जखम झाली असून त्यांच्यावर पोलिसांनी बेदकारपणे वाहन चालविण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS