चंद्रपूर पंचायत समितीतील भाजपच्या महिला सदस्याची आत्महत्या !

चंद्रपूर पंचायत समितीतील भाजपच्या महिला सदस्याची आत्महत्या !

चंद्रपूर – चंद्रपुरातील पंचायत समितीतील भाजपच्या सदस्या शालू शिंदे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून घुग्गूस येथील केमीकल वार्डात त्या राहत होत्या. मंगळवारी सकाळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरात सकाळी १० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

दरम्यान सकाळी दहा वाजताच्या दरम्यान त्यांनी आत्महत्या केली असून आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. शालू शिंदे यांनी केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. तसेच त्यांच्या जाण्यामुळे चंद्रपुरातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

COMMENTS