येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार -अशोक चव्हाण

येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करणार -अशोक चव्हाण

औरंगाबाद – आगामी लोकसभा निवडणुकीसोबत राज्यातील विधानसभा निवडणूक होणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सूचना चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. औरंगाबाद येथील सभेत बोलत असताना  चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील असही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजपने केलेल्या सर्व्हेनुसार लोकसभेसोबत जर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर त्याचा भाजपला फायदा होईल असे म्हटले होते. त्यामुळे भाजप लोकसभेसोबतच राज्यात देखील निवडणुका घेऊ शकते असं बोललं जात आहे.
चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून आघाडीतील दोन्ही पक्षांनी लोकसभेसोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS