छगन भुजबळ म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणजे आजचे….

छगन भुजबळ म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणजे आजचे….

नाशिक – राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची स्तुती केली आहे. संजय राऊत म्हणजे आजचे आचार्य अत्रे आहेत, अशा शब्दात स्तुतिसुमनं उधळली आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, असं संजय राऊत पहिल्यापासून सांगत होते. ते आजचे आचार्य अत्रे आहेत, असं भुजबळ म्हणाले.नाशिक जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला संजय राऊत आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले होते.

दरम्यान मंत्री झाल्यानंतर हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. अध्यक्ष म्हणून राऊत यांच्या माध्यमातून चांगली व्यक्ती मिळाली. नाशिकला अनेक विकास कामं 2014 पूर्वी अंमलात आणली आहेत. जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचं कामही लवकर होण्यासाठी प्रयत्न करणार, असं भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. नाशिकमध्ये दीड हजार कोटी रुपयांपर्यंत निधी मिळणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेच पाहिजेत असंही यावेळी भुजबळ म्हणाले.

COMMENTS