संभाजी छत्रपती आजपर्यंत कधी मॅनेज झालेला नाही, तलवार असो की गोळी पहिला वार माझ्यावर असेल – संभाजीराजे

संभाजी छत्रपती आजपर्यंत कधी मॅनेज झालेला नाही, तलवार असो की गोळी पहिला वार माझ्यावर असेल – संभाजीराजे

नाशिक – मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक आज नाशिकमध्ये पार पडली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ही बैठक पार पडली. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने आज या बैठकीला उपस्थित होते. यावेळी संभाजीराजेंनी या मोर्चाचं नेतृत्व करावं असा नाशिकच्या बैठकीत ठराव झाला. परंतु संभाजीराजेंनी नम्रपणे या मोर्चाचं नेतृत्व करण टाळलं. मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचं मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार असल्याचं ते म्हणाले.

यावेळी बोलत असताना संभाजीराजे म्हणाले छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही, छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून इथे आलोय. कुटुंबप्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. नेतृत्व करण्याचं मी नम्रपणे टाळतो, पण शेवटपर्यंत लढाई लढणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्यासोबत राहणार असं संभाजीराजे म्हणाले.

मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झालेला नाही. मॅनेज झाला तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ असेल. मग तो गोळीचा असो किंवा तलवारीचा असंही संभाजीराजे म्हणाले. तसेच भावनिक व्हायचं नसतं, काही वेळेस गनिमी काव्याने काम करायचं असतं, असंही संभाजीराजे म्हणाले.

COMMENTS