चंद्रकांत पाटलांचा आत्मविश्वास, “40 वर्षात माझा अंदाज कधीच चुकला नाही !”

चंद्रकांत पाटलांचा आत्मविश्वास, “40 वर्षात माझा अंदाज कधीच चुकला नाही !”

सांगली – भाजपकडून सांगलीमध्ये बुथ प्रशिक्षण शिबिराचं आयोजन  करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपला अंदाज कधीच चुकला नसल्याचा आत्मविश्वास व्यक्ते केला आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत महापौर भाजपचाच होणार असल्याचा अंदाज चंद्रकांतदादांनी व्यक्त केला आहे. तसेच 40 वर्षात माझा अंदाज शक्यतो कधीच चुकला नसून सांगलीचा सर्व्हे माझ्या हातात आहे, फक्त जोतिष शास्त्रावर सांगत नाही पण नक्की भाजपाचा महापौर होणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलं आहे.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरक्षेत्रात भाजपचं बूथ प्रमुख प्रशिक्षण शिबिर सांगलीत संपन्न झालं. त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना चंद्रकांतदादांनी हा आत्मविश्वास वर्तवला आहे. आमचाच महपौर होणार असल्याचं कोणी कितीही म्हटलं तरी भाजपचाच महापौर होणार असून माझा 40 वर्षांपासूनचा अंदाज कधी चुकला नाही. असंही चंद्रकांतदादांनी त्यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS