महाराष्ट्रात फार काळ मुख्यमंत्री राहता येत नाही – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात फार काळ मुख्यमंत्री राहता येत नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई – पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपची झालेली कोंडी आणि शिवसेनेसोबत युती टिकवण्यासाठी सुरू असलेली कसरत अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सूचक विधान केलं असून महाराष्ट्रात फार काळ मुख्यमंत्री राहता येत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास असल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान मुंबईतील विक्रोळीमधील सुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान या हॉस्पिटलचं भूमीपूजन माझ्या हस्ते करण्यात आलं आणि आज उद्घाटनही माझ्या हस्ते होत असल्यामुळे असा योग कमी येतो. एकत्र हॉस्पिटल वेगाने तयार झाले, की मी फार काळ मुख्यमंत्री राहिलो हे मला कळत नाही. मात्र महाराष्ट्रात फार काळ मुख्यमंत्री राहता येत नाही असा इतिहास आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी गमतीत म्हटलं आहे.

COMMENTS