राष्ट्रवादी काँग्रेस आता पराभूत मानसिकतेची पार्टी – देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेस आता पराभूत मानसिकतेची पार्टी – देवेंद्र फडणवीस

सातारा –  राष्ट्रवादी काँग्रेस आता पराभूत मानसिकतेची पार्टी झाली असून या निवडणुकीनंतर ती दिसणारच नाही. या राष्ट्रीय अस्मितेच्या निवडणुकीनंतर फक्त आणि फक्त मोदींचे नेतृत्वच देशाने मोठ्या विश्वासाने उभे केल्याचे दिसून येईल असं वक्तव्य.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच पवार नावाच्या जाणत्या राज्याला आता बंद असलेलं रेल्वेचं इंजिन भाड्याने मिळतं. ते कितीही प्रयत्न केले तरी आता चालत नाही अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनू केली आहे.
ते  सातारा येथील प्रचार सभेत बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदींना शिव्या देणे हा धंदाच आहे. या देशात फक्त मोदी गरिबी आणि विविध प्रश्नांसाठी लढले. ३४ हजार कोटी लोकांना त्यांच्या योजनांचा थेट खात्यात पैसे मिळून फायदा झाला. आम्ही भ्रष्ट बाबूगिरी आणि दुराचाऱ्यांच सरकार संपवलं. साखर कारखान्याचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले. मात्र, पवारांनी कृषी मंत्री असताना साखर कारखानदारांचे, इथेनॉलचे निर्णय न घेता दाबून ठेवले अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, शहरातील पालिकेच्या प्रकल्पांना निधी दिला. उदयनराजे तुम्ही तुमच्या सरकारच्या दहा वर्षात कोणताही निधी आणला नाही तो आम्हीच दिला हे तुमच्या नेत्यांना खरं खरं सांगा असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

COMMENTS