मुख्यमंत्र्यांनी प्रमोद जठार यांचा राजीनामा फाडून राजन तेलींच्या खिशात टाकला !

मुख्यमंत्र्यांनी प्रमोद जठार यांचा राजीनामा फाडून राजन तेलींच्या खिशात टाकला !

सावंतवाडी – कोकणातील नाणार प्रकल्प रद्द केल्यामुळे भाजपाचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज राजीनामा दिला. जठार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. परंतु मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नसून फाडून टाकला. एवढच नाही तर तो फाडलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी एकेकाळचे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे नेते राजन तेली यांच्या खिशात टाकला. तेलींच्या खिशात हा राजीनामा टाकल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी सिंधुदूर्गमध्ये आले होते. यावेळी जठार यांनी त्यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजकीय भांडणामुळे नाणार प्रकल्प रद्द झाला. यात कोकणचे पुढील पन्नास पिढ्यांचे नुकसान झाले असून कोकणवासीयांनी कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्ग, धरण प्रकल्प आदी विकास कामांना जमिनी दिल्या. त्याचा फायदा जगाला झाला. पण कोकणात रोजगार निर्माण झाला नाही असं जठार यांनी म्हटलं आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जठार यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करत तुमचे रोजगार उपलब्ध करण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

COMMENTS