उस्मानाबाद – मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात निष्ठावंतांना रोखले !

उस्मानाबाद – मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात निष्ठावंतांना रोखले !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज उस्मानाबादच्या दौ-यावर आहेत. यआज सकाळी मुख्यमंत्री शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात निष्ठावंतांना पोलिसांनी रोखले असल्याचं पहावयास मिळालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत पक्षाचे अनेक कार्यकर्ते होते. यामध्ये पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड. मिलींद पाटील होते. मात्र त्यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच रोखण्यात आली. पोलिसांना ते समजावण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही सुरक्षेच्या आणि पार्किंगच्या कारणावरून त्यांना प्रवेश दिला नाही. कार्यालयाच्या दुसऱ्या गेटवरून त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. तेथेही त्यांना पोलिसांनी रोखले. मात्र काही महिन्यांपूर्वी भाजपात दाखल झालेली मंडळी बिनधास्थपणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फिरत होती.

त्यामुळे मिलींद पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपात दाखल झालेल्या नवीन मंडळींना प्रवेश दिला जातो आणि आम्हाला का दिला जात नाही असा सवालही त्यांनी केला आहे. या घटनेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

COMMENTS