भाजपचे सत्ताकाळातील सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन, येत्या ६ तारखेला मुंबईत !

भाजपचे सत्ताकाळातील सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन, येत्या ६ तारखेला मुंबईत !

मुंबई – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप मंत्री आणि आमदारांची बैठक आज पार पडली आहे. 6 एप्रिल रोजी होणा-या भाजपच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली होती. तसेच वर्धापन दिनी भाजप मुंबईत सत्ताकाळातील मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. अमित शाह यांच्या भाजप वर्धापनदिनाला मुंबईत बिकेसी येथे भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच या बैठकीत सर्व आमदारांना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

दरम्यान 6 एप्रिलला भाजप मुंबईमध्ये पक्ष स्थापना दिनानिमित्त शक्तिप्रदर्शन करणार आहे. यासाठी बिकेसीवर आयोजित कार्यक्रमात राज्यभरातून 3 लाखपेक्षा जास्त कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भाजपाने ‘ भारत महाभाजप – महामेळावा ‘ असे नाव दिले असून पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 2013 ला नरेंद्र मोदी यांची पक्षातर्फे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यावर भाजपाने मुंबईत बीकेसी मैदानावर ‘ महागर्जना ‘ रॅली घेत शक्तिप्रदर्शन केले होते.

तसेच आगामी निवडणुकीला अवकाश असतांना पक्ष स्थापना दिनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करुन नेमका कोणाला आणि काय इशारा दिला जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS