…त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन !य

…त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आवाहन !य

मुंबई – मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली, लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापणा न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुस्लीम धर्मीयांचा महत्त्वाचा सण बकरी ईदला कुर्बानीसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन हे आवाहन केलं आहे.

दरम्यान कोरोना व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच काम नये. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत, किंबहुना नियंत्रित प्रमाणात उघडल्या आहेत. जुलै अखेरीस कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. ऑगस्टपासून जर हा आलेख वर गेला तर नियंत्रण कठीण होईल. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली. लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापणा न करता आरोगयोत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला.

त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, मटण शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर घेता येईल. गेल्या 4 महिन्यात सर्व सण सर्व समाज घटकांनी घरात साजरे केले. लोकांनी गर्दी टाळावी आणि संसर्ग वाढेल अशी कुठलीही कृती टाळावी. नेत्यांची जबाबदारी समाजाला दिशा दाखवणं आहे. त्यामुळे आपण लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करावेत. असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

COMMENTS