धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर राज्यातील २४ हजार संगणक परिचालकांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !

धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर राज्यातील २४ हजार संगणक परिचालकांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !

मुंबई – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या मागणीनंतर संगणक परिचालकांचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लागण्याचे चिन्ह आहेत.  संगणक परिचालक माहिती तंत्रज्ञान विभागाशी संलग्न करण्यासाठी आठ दिवसांत बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

गेल्या चार वर्षांपासून संगणक परिचालक त्यांच्या न्याय मागण्यासाठी लढा देत आहेत.  संगणक परिचालक यांना माहिती व तंत्रज्ञान विभागात सामावून घ्यावे अशी त्यांची मुख्य मागणी आहे. महिनो न् महिने त्यांचे वेतन होत नाही. त्यांची दिवाळीसुद्धा पगाराविना अंधारात गेली. सध्या दिला जाणारा सहा हजार रुपये महिना हा खूपच तुटपुंजा आहे; त्यांची योग्य त्या प्रमाणात वाढावावा यासाठी जवळपास १५ हजार संगणक परिचालक आझाद मैदानात आंदोलन करत आहेत अशी माहिती देत मुंडे यांनी त्यांच्या सर्व मागण्या सोडवण्याची मागणी आज विधान परिषदेत एका लक्षवेधीच्या माध्यमातून केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील आश्वासन दिले.संगणक परिचालक प्रश्न सोडवण्यास असमर्थ पंकजा मुंडेंची कबुली

संगणक परिचालकांच्या प्रश्नांविषयी धनंजय मुंडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, सरकार तर्फे ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे उत्तर देणार असे सांगितले गेले. यावर पंकजा मुंडेंनी पंकजा मुंडे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दिलेल्या प्रश्नाने समाधान झाले नाही म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर द्यायचा धनंजय मुंडेंनी आग्रह धरला. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभाग आपल्या अखत्यारित येत नसल्याने पंकजा मुंडेंनीदेखील संगणक परिचालकांचा प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थता दर्शविली.

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या आठ दिवसांत संगणक परिचालकांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे.

COMMENTS