महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी,  जिल्ह्यांच्या सीमाही बंद – उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमाही बंद – उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य तसेच त्यांची ने आण करणारी वाहने सुरु राहतील. पशू खाद्य मिळेल, पशूंचे दवाखानेही उघडे राहतील. कृषीमालाशी सबंधित वाहतूक सुरु राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यातील विमानतळेही बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. तेही लवकरात लवकर बंद होतील असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करुन या सेवेसाठी तयार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्यांना प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी देखील काळजी घेणे खूप आवश्यक आहे. जे घरी विलगीकरणात आहेत त्यांनी सरकारच्या सूचना पाळायच्या आहेत. ही कठोर पाऊले केवळ जनतेच्या हितासाठी उचलली असल्याचंही ते म्हणालेत.

COMMENTS