काँग्रेस खासदारांकडून संसदेबाहेर नकली चेकचे वाटप !

काँग्रेस खासदारांकडून संसदेबाहेर नकली चेकचे वाटप !

नवी दिल्ली – विविध मुद्द्यांवरुन भाजप सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस खासदारांनी संसदेबाहेर चक्क नकली चेकचे वाटप केले आहे. भाजपला आपल्या आश्वासनांची आठवण करुन देत संसदेबाहेर १५ लाख रुपयांच्या नकली चेकचे वाटप करण्यात आले आहे. हे नकली चेक खऱ्या चेक प्रमाणेच हुबेहुब बनवण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यावर पतंप्रधान मोदींची स्वाक्षरीही मुद्रीत करण्यात आली आहे. तसेच त्यावर फेकू बँक असे लिहिण्यात आले आहे.

दरम्यान अर्थसंकल्पही सादर झाला मात्र, पंतप्रधानांची फेकू बँक कुठे आहे. लोकांना अद्याप १५ लाख रुपये मिळालेले नाहीत. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी जनतेला सर्वांच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याचीच आठवण त्यांना करुन देण्यात येत असल्याचं या खासदारांनी म्हटलं आहे. यावेळी काँग्रेस खासदारांनी शेजारून जाणाऱ्या भाजपाच्या खासदारांनाही हे चेक देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे चेक न घेताच भाजपा खासदार तिथून निघून गेले.

COMMENTS