काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात ‘यांना’ उमेदवारी!

काँग्रेसची चौथी यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांविरोधात ‘यांना’ उमेदवारी!

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 19 जणांना उमेदवारी देण्यात आली असून नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आशिष देशमुख विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांना काँग्रेसकडून अमरावतीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत कणकवली मतदारसंघातून सुशिल राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान आतापर्यंत काँग्रेसच्या चार याद्या जाहीर झाल्या आहेत. काँग्रेसने पहिल्या यादीत ५१, दुसऱ्या यादीत ५२, तिसऱ्या यादीत २० आणि चौथ्या यादीत १९ असे मिळून १४० उमेदवारांचा नावे जाहीर केली आहेत. आतापर्यंत एकूण 142 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. परंतु दोन उमेदवार बदलले असल्यामुळे आतापर्यंत 140 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

COMMENTS