काँग्रेस पाहूण्यांच्या स्वागतासाठी भाजपा नेत्याच्या पायघड्या, ‘पाहूणचाराच्या’ कार्यक्रमात मोठी खलबते !

काँग्रेस पाहूण्यांच्या स्वागतासाठी भाजपा नेत्याच्या पायघड्या, ‘पाहूणचाराच्या’ कार्यक्रमात मोठी खलबते !

बीड – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बड्या पक्षांच्या नेत्यांकडून राज्यात सभा घेतल्या जात आहेत. आगामी निवडणुका आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच वाढती महागाईविरोधात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान भाजप सरकारवर काँग्रेस नेत्यांकडून जोरदार टीका केल्या जात आहेत. परंतु अंबाजोगाईतील जन संघर्षयात्रेत भाजपा सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांनी संध्याकाळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी पाहुणचार घेतल्याचं समोर आहे.

दरम्यान काल जनसंघर्ष यात्रेची सभा पार पडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता पाटील यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने “पाहूणचाराच्या” कार्यक्रमात मोठी खलबते झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तसेच भाजपा नेत्याने काँग्रेसच्या दिग्गजांचा पाहुणचार करण्यासाठी नेमक्या “पायघड्या” का घातल्या? असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या या पाहूणचाराच्या कार्यक्रमामुळे आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS