काँग्रेसची आज बैठक, दिग्गज नेत्यांची नावे गटनेतेपदासाठी स्पर्धेत!

काँग्रेसची आज बैठक, दिग्गज नेत्यांची नावे गटनेतेपदासाठी स्पर्धेत!

मुंबई – काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्य कार्यालयात काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त आमदारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत काँग्रेसच्या विधिमंडळाच्या गटनेत्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान काँग्रेस गटनेतेपदासाठी दिग्गज नेत्यांची नावे स्पर्धेत आहेत. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची नावे स्पर्धेत आहेत. त्यामुळे गटनेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS